शिरसगाव येथे २ कोटींच्या विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन
‘पलूस-कडेगाव’ विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिला असून स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांची विकासाची ही परंपरा कायम अबाधित आहे, येणाऱ्या काळात सुद्धा याठिकाणी लागेल तेवढा निधी देण्याची माझी जबाबदारी आहे, त्यासाठी तुमचा आमदार म्हणून मी कुठेही कमी पडणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आ.डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
शिरसगाव (ता. कडेगाव) येथे २ कोटी रुपयाच्या विविध विकासकामांच्या उदघाटन व भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारती बँकेचे संचालक डॉ. जितेश कदम, युवा नेते दिग्विजय कदम, युवा नेते
हर्षवर्धन कदम, सरपंच सुप्रिया मांडके, उपसरपंच किशोर पवार आदी प्रमुख उपस्थित होते, यावेळी पुढे बोलताना आ.डॉ. कदम म्हणाले, शिरसगाव व सोनसळ या दोन्ही गावांचा वेगळा स्नेह आहे, या गावाने नेहमीच स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या विचारांची पाठराखण केली आहे. याठिकाणी विकासाचे कोणतंही काम शिद्धक राहणार नाही, लागेल तेवढा विकासनिधी याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल तुम्ही फक्त एकदिलाने व एकविचाराने विकासकामे सुचवा ती पूर्ण करण्याची माझी जवाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी जि.प.शिक्षण विभाग स्वीय निधी मधून जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे (१३.१५ लक्ष), जिल्हा विशेष योजना मधून दुष्काळ ओक्रयावा साकय पूल बांधणे (३५ लक्ष), लघु पाटबंधारे विभाग मधून बेरडकी ओढ्यावरती सिमेंट नाला बंधारा बांधणे (२६ लक्ष), १५ वा वित्त आयोग मधूर बॉटर ए टी एम बसवणे (४ लक्ष), डोंगरी विकास मधून अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१२ लक्ष), १५ वा वित्त आयोग मधून ग्रामपंचायत फर्निचर करणे (४.५० लक्ष), १५ वा वित्त आयोग मधून बंदिस्त घटक बांधकाम करणे (७ लक्ष), ‘क’ वर्ग मधून श्री अमृतेश्वर मंदिर फरशी बसवणे (४ लक्ष), जि.प. शिक्षण विभाग स्वीय निधी मधून जि.प. शाळा वॉल कंपाऊंड करणे (१३ लक्ष), १५ वा वित्त आयोग मधून जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल स्मार्ट पॅनल बसवणे, ग्रामपंचायत सोलर बसवणे, गावाअतर्गत सि. सि. टी. व्ही. कॅमेरा बसवणे (६ लक्ष), जिल्हा गौणखनिज निधी मधून गावांअंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे (५ लक्ष), जिल्हा नियोजन मधून सोनी हिरावड्यावरती पूल बांधकाम करणे (६० लक्ष), डोंगरी विकास मधून अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण करणे (१२.५० लक्ष) इत्यादी कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सतीश मांडके, युवक नेते राहुल मांडके, एकनाथ पवार, दिलीप पवार, शमशुद्दीन मुलाणी, प्रशांत मांडके, राजेश यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

