शिरसगाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी शिरसगाव (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीने एक जानेवारी २०२४ पासून पुढे जन्मलेल्या मुलींच्या खात्यावर ५ हजार रुपयांची ठेव पावती करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या निर्णयाचे तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.
शिरसगाव येथे झालेल्या ग्रामसभेमध्ये गावात १ जानेवारी २०२४ पासून पुढे जन्मलेल्या तसेच जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर ५ हजार रुपयांची ठेव पावती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलीचे वय २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना ही पावती मोडून पैसे घेता येणार आहे.
या निर्णयासाठी सरपंच सुप्रिया मांडके, उपसरपंच किशोर पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
