विकास कामांचा पाठपुरावा करणार : आ. डॉ. कदम

कडेगाव तालुक्यातील शिरसगाव येथे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते सुमारे दोन कोटी ३० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले. भागात विकास कामांचा पाठपुरावा करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी पलूस कडेगावमधील प्रत्येक गावामधील विकास कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे निधी आणून विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने विकासाला चालना देण्यासाठी लागेल ती मदत करण्याची तयारीही दर्शवली.

यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणेसाठी रु. १३ लाख १५ हजार, दुष्काळ ओढ्यावर साकव पूल बांधणे कामाचे उद्घाटन सुमारे ३५ लाख रुपये, बेरड वस्ती ओढ्यावर सिमेंट नाला बंधारा बांधणे कामाचे उद्घाटन सुमारे २६ लाख, तसेच गावामध्ये वॉटर एटीएम बसवणे कामाचे उद्घाटन सुमारे चार लाख, अंतर्गत रस्ते सुधारणा करणे कामाचे उद्घाटन सुमारे १२ लाख, ग्रामपंचायत फर्निचर करणे कामाचे उद्घाटन सुमारे चार लाख ५० हजार, बंदिस्त गटार बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन सुमारे सात लाख, श्री अमृतेश्वर मंदिर येथे फरशी बसवणे कामाचे उद्घाटन सुमारे चार लाख, जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंड करणे कामाचे भूमिपूजन सुमारे १३ लाख, जिल्हा परिषद शाळेत डिजिटल स्मार्ट पॅनल बसवणे, ग्रामपंचायत सोलर बसवणे, गावांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे कामांचे उद्घाटन सुमारे सहा लाख, गावांतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण करणे कामाचे उ‌द्घाटन सुमारे पाच लाख, सोनहिरा ओढ्यावर पूल बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन सुमारे ६० लाख, अशा कामांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, डॉ. जितेश कदम, डॉ. दिग्विजय कदम, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top